नवी दिल्ली : सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे. सोन्याचे दर 150 रुपयांनी घसरले आहेत. सध्या सोन्याचे दर 30,900 रुपये प्रती तोळा इतक्या आहेत. विशेष म्हणजे बुधवारी सोन्याचा भाव चारशे रुपयांनी वधारला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरांमध्ये घट झाली असली तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. एक किलो चांदीच्या दरात सुमारे तेराशे रुपयांची वाढ पाहायला मिळाली. यापुढे सुद्धा चांदीला चढी मागणी असेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय. 


ब्रिटनचं युरोपामधून बाहेर पडायचा निर्णय आणि ज्वेलर्स व्यापाऱ्यांकडून कमी झालेली मागणी या दोन प्रमुख कारणांमुळे सोन्याचे भाव पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


दिल्लीच्या मार्केटमध्ये 99.9 परसेंट आणि 99.5 परसेंट प्युरिटी असलेल्या सोन्याच्या दरांमध्ये 150 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत आता 30,900 आणि 30,750 एवढी आहे.