नवी दिल्ली : सोन्यांच्य़ा किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २९ हजारांहून कमी झालेत. प्रति तोळा सोन्याचे दर २७० रुपयांनी घसरत ते २८,८०० रुपयांवर पोहोचलेत. गेल्या सहा आठवड्यांतील हा नीचांकी स्तर आहे. 


सोन्याच्या मागणी घटल्याने त्याचे परिणाम किंमतीवर पाहायला मिळतायत. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळतेय. चांदीच्या दरात ६५० रुपयांची घट होत ते ३८,८५० रुपयांवर बंद झालेत. 


दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा २८,८०० आणि २८,७३० रुपयांवर बंद झाले. याआधी पहिल्या तीन दिवसांत सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले.