नवी दिल्ली : जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीची मागणीही कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमतीत मात्र 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा भाव 42,110 रुपये प्रती किलो झाला आहे.


जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 2 दिवसात वाढ झाली त्यानंतर आज 300 रुपयांची घट झाली आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव 0.8 टक्क्यांनी घसरुन 1,313.62 डॉलर प्रती 10 ग्रॅम झाला आहे.