सोन्याचे दर पुन्हा घसरले
सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
सराफा बाजारात घटलेली मागणी आणि जागतिक मंदीमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर 260 रुपयांनी घसरले. चांदीच्या दरातही 160 रुपयांची कपात झालीये.
दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे दर अनुक्रमे 30,150 आणि 30,000 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
न्यूयॉर्कमध्ये बुधवारी सोन्याचे दर 0.56 टक्क्यांनी कमी होत 1252.40 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. तर चांदीचे दर 1.02 टक्क्यांनी घसरुन 17.43 प्रति औंसवर पोहोचले होते.