सोन्याच्या दरात घसरण, ६ आठवड्यातील नीचांकी स्तर
सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.
नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.
कमी मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात ३७० रुपयांची घट होऊन ते प्रतिग्रॅम २९,२०० वर पोहोचले. तर चांदीच्या दरातही ५० रुपयांची घसरण होत ते ३९,४५० वर पोहोचले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. स्थानिक बाजारातही सोन्याची मागणीही कमी झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय.