GOOD NEWS : नवीन वर्षात सोने दरात मोठी घसरण
८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मोदी सरकारने रद्द केल्या. या नोटबंदीनंतर सोने दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीप्रमाणात अच्छे दिन आले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये सोने दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २६,००० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मोदी सरकारने रद्द केल्या. या नोटबंदीनंतर सोने दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीप्रमाणात अच्छे दिन आले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये सोने दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २६,००० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
नोटबंदीचा सराफा व्यवसायावर परिणाम दिसून येत आहे. सोने मागणी घटल्याने सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसात सोने दरात १००० रुपयांनी सोने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने प्रति तोळा २६ हजार रुपये इतके खाली येऊ शकते.
अमेरिका फेरडल बॅंकेने व्याज दरात वाढ केली आहे. याचा परिणाम सराफा बाजारावर दिसत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने खरेदीत घट झाली आहे. अमेरिकेतील कॉमेक्स आणि आंतराष्ट्रीय एक्सचेंज व्यापारी २०१७ च्या सुरुवातीला कमी किमतीत सोने विकू शकतील. भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. याचा प्रभाव करंट अकाऊंड बॅलेन्स आणि रुपयांवर होतो. फेब्रुवारीत अमेरिकेत १,१०० डॉलर प्रति औंस सोने दर घसरलाय. याचाही परिणाम हा सोने व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर सोने दरावर याचा परिणामही दिसून आलाय.