निपाणी :  निपाणी पोलीसांनी मांगुर फाटा येथे स्विफ्ट कारमधून तब्बल १ कोटी ५७ लाख रुपये रोख आणि ८ किलो ७७९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. बेकायदेशीरपणे इतकी रक्कम आणि सोनेसोबत बाळगल्याप्रकरणी मुंबई आणि बेळगाव येथे सहा जणांना अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, संकेश्वर, बेळगांव आणि गोकाक या भागात बेकायदेशीर सोने आणि सोन्याची बिस्कीटं विक्री करणारी आंतराज्य टोळी असल्याची माहिती निपाणी पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर निपाणी पोलीसांनी पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला. त्यावेळी मुंबई इथले चंपालाल चव्हाण, रणजिंतसिंग रजपूत, कांतीलाल कुमावत, धरशीत परमार आणि बेळगांव इथले हर्षा पोरवाल  आणि प्रविण पोरवाल हे बेकायदेशीररित्या तब्बल १ कोटी ५७ लाख रुपये रोख आणि  8 किलो 779 ग्रॅम सोन स्विफ्ट गाडीतून नेत असताना सापडले. 


पोलीसांनी रोख रक्कम आणि सोन जप्त केल असून संबधीत सहा जणांना अटक केलीय. या प्रकऱणी आता महाराष्ट्रातील अनेक शहर निपाणी पोलीसांच्या तपासाच्या रडारवर आली असून पोलीसांची अनेक पथकं महाराष्ट्रात तपासासाठी रवाना होणार आहे.