सोन्या-चांदीच्या दरात होतेय वाढ
स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्याचे परिणाम त्याच्या किंमतीवर दिसतायत. आज सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
नवी दिल्ली : स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्याचे परिणाम त्याच्या किंमतीवर दिसतायत. आज सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
सोन्याच्या दरात आज १६० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोन्याचे दर आज प्रतिग्रॅम २८,७६० रुपयांवर बंद झाले. काल सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली होती.
चांदीच्या दरातही वाढ झालीये. चांदीच्या दरात ४०० रुपयांची वाढ होत ते प्रतिकिलो ३९,३०० रुपयांवर बंद झाले.
दिल्लीत आज सोन्याचे दर प्रतितोळा २८,७६० रुपये, मुंबईत सोन्याचे दर प्रतितोळा २८,२८५ रुपये, कोलकातामध्ये सोन्याचे दर प्रतितोळा २८,७९५ रुपये तर चेन्नईमध्ये सोन्याचे दर प्रतितोळा २७,२१० रुपयांवर बंद झाले.