सोने चांदीच्या दरात घट
परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले.
नवी दिल्ली : परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले.
तर चांदीच्या दरात १५० रुपयांना घट होऊन चांदी प्रति किलो ४६ हजार ३५० रुपये झाली आहे.
सोन्याने गेल्या आठवड्यात वाढ होऊन दोन महिन्यातील उच्चांक पातळीला गेले होते.