नवी दिल्ली : ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचे दरांत ८ टक्क्यांनी वाढ तर चांदीच्या दरात तब्बल चार टक्क्यांनी वाढ झालीये. गेल्या दोन वर्षांतील सोन्याच्या किमतीतील मोठी वाढ आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीत ७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. 


जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत ८ टक्के वाढ झाल्यानंतर सोन्याचे दर १३५५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले. तर चांदीच्या दरात चार टक्क्यांची वाढ होत ते १८.०६ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले.