तिरुअनंतपुरम : केरळमधल्या पद्मनाभ मंदिरातलं तब्बल 776 किलो सोनं गायब असल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हंटलंय. या सोन्याची किंमत 186 कोटी रुपये इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पद्मनाभ मंदिर व्यवस्थारनाच्या कारभारात ब-याच उणिवा आहेत. मंदिरात दानाच्या स्वरुपात आलेले सोनं-चांदीचे अलंकार ज्यावेळी कंत्राटदाराकडे वितळवण्यासाठी दिले जातात, त्यावेळी त्याचा नीट हिशोब ठेवला जात नाही. 


तसंच दान आलेल्या अलंकारांचा आणि मौल्यवान वस्तूंचीही नीट माहिती ठेवली जात नाही, असं कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हंटलंय. 


सुप्रीम कोर्टानं 2014 मध्ये माजी कंट्रोलर ऑडिटर जनरल विनोद रॉय यांना या पद्मनाभ मंदिराचं स्पेशल ऑडिट करायला सांगितलं होतं. त्यांनी हा अहवाल दिलाय.