गुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
नवी दिल्ली : 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलताना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तसेच बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. आता नागरिकांना आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहेत ही मर्यादा पूर्वी केवळ 20हजार रुपये एवढीच होती. एटीएममधून नागरिकांना आता दिवसाला अडीच हजार रुपये काढता येणार आहेत तर बँकेतून बदलून मिळणा-या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. आता चार हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपयांच्या चलनी नोटा प्रत्येकाला बँकेतून बदलून मिळणार आहेत.
अर्थ मंत्रालयानं तसे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या या आदेशामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. शिवाय दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांसाठी बँकेत वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.. शिवाय पेन्शन धारकांनाही दिलासा मिळालाय.
पेन्शनधारकांना त्याचा हायातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे दाखले नोव्हेंबरपर्यंत सादर करावे लागत होते.. मात्र त्यालाही आता दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
ठळकबाबी
- जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा 4000 हजारावरून 4 हजार 500 करण्यात आली आहे.
- एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा दोन हजारांवरून दोन हजार 500 करण्याची सूचना बॅंकांना देण्यात आली आहे.
- बॅंकेतून रक्कम काढण्याची मर्यादा आठवड्याला 20 हजार रुपयांवरून 24 हजार करण्यात आली आहे.
- एटीएम आणि बॅंकांमधून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची रोकड लोकांनी काढली.
यांना खास सवलत
- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना पैसे काढण्यासाठी बॅंकेत विशेष व्यवस्था किंवा स्वतंत्र रांग सुरु करण्याचे बॅंकाना निर्देश
- निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना हयात दाखला देण्याची मुदत वाढवली, आता 15 जानेवारी 2017 पर्यंत दाखला देण्याची मुभा