नवी दिल्ली : आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.  


प्रयत्नांना यश... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभयारण्यात १२५ सिंहीणी आहेत. २०१५ मध्ये गिर अभयारण्यात १०९ सिंह, २०१ सिंहिणी आणि २१३ छावे होते.  सिंहांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यांना आता यश येताना दिसतंय, असं इथले मुख्य समन्वयक ए. पी. सिंह यांनी म्हटलंय. 


गिरमध्ये सिंहांच्या बछड्यांकडेही वन खात्याचं बारीक लक्ष असतं. बछड्यांना जगवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जातो. त्याच्याच परीणाम म्हणून आता १०० सिंहीण गाभण राहिल्यात.  


शिकारीवर प्रतिबंध... 


जुनागढचे तत्कालीन नवाब महाबत खान रसूल खान खांजी यांनी वाघांच्या, सिंहाच्या शिकारीवर प्रतिंबध केला होता. त्यावेळी ११ सिंह होते, असं तज्ज्ञ सांगतात. 


गिरमधील आताच्या सिंहांमधील आजार हा जीन्सचा परिणाम आहे. कारण आताचे सिंह हे त्या ११ सिंहाचेच वंशज आहेत. गिरच्या १४०० चौरस किलोमीटरमध्येच हे सिंह आता मर्यादीत नाहीत तर गुजरातमधील २१ हजार चौरस किलोमीटरमध्ये हे सिंह आढळतात. नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सगळेच जण सज्ज झाले आहेत.