खूशखबर! तुमच्या अकाऊंटमध्ये असे येणार आहेत ५० लाख रुपये
एक आनंदाची बातमी मिळणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्या नंतर आता तुम्हाला ते एक आनंदाची बातमी देऊ शकतात. अशी माहिती आहे की, सरकार ज्यांच्याकडे स्वत:चं घर नाही अशषा लोकांना स्वस्त व्याजदराने ५० लाख रुपये लोन देऊ शकते. यामुळे प्रत्येकाला हक्काचं घर मिळेल.
या योजनेसाठी सरकार आणि रिजर्व्ह बँक यांच्यात चर्चा देखील सुरु असल्याचं म्हटलं जातंय. केंद्र सरकार २०१७ च्या बजेटमध्ये किंवा त्याआधीच याची घोषणा करु शकते. या वेळेस बजेट सरकार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे. सरकारने जर हे पाऊल उचललं तर याचा फायदा अनेकांना होणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल.