सोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा `आम आदमी` गायब
काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या `आधार कार्ड`च्या टॅगलाईनमधून आता `आम आदमी` गायब झालाय.
नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय.
'मेरा आधार, मेरी पहचान'
लोकांच्या मागणीवरून आधारची टॅगलाईन 'आम आदमी का अधिकार' ऐवजी 'मेरा आधार, मेरी पहचान' अशी करण्यात आलीय. ही मागणी करणाऱ्यांमध्ये एका भाजप नेत्याचाही समावेश आहे.
दिल्ली भाजप प्रवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी १९ सप्टेंबर २०१५ रोजी पंतप्रधान कार्यालयात एक अर्ज देऊन 'आधार इज राइट ऑफ कॉमन मॅन' या टॅगलाईनमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती.
आधार कार्ड हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे... मग तो दारिद्र्यरेषेखाली असोकिंवा नसो... यानंतर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून २८ जून रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रात ही टॅगलाईन बदलल्याचं म्हटलंय.