आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता
केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.
नवी दिल्ली : केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. केंद्र सरकार आता चार लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
चार लाखांपासून थेट 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला 10 टक्के कर, 10 ते 15 लाखांपर्यंत 15 टक्के कर, तर 15 ते 20 लाखांच्या उत्पन्नासाठी 20 टक्के आणि 20 लाखांवरील उत्पन्नासाठी 30 टक्के कर भरावा लागण्याची शक्यता आहे. सध्या अडीच लाखांच्या उत्पन्नापर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही.