नवी दिल्ली :  बँक लॉकर लवकरच सील होणार असल्याच्या अफवा पसरत असल्याने लोक अस्वस्थ झाले, त्यांना दिलासा म्हणून सरकारने स्पष्ट केले की सरकार बँकेचे लॉकर सील करणार नाहीत तसेच सामान्यांच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्याचा कोणताही विचार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत खासदार राम चरित्र निषाद यांच्या लिखीत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 


निषाद यांनी विचारले होते की, सरकारचा बँक लॉकर, आणि घरातील सोने -हिऱ्याचे दागिने सील करण्याच विचार आहे का. त्यावर मंत्रींनी केवळ नाही असे उत्तर दिले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर  वेगवेगळ्या अफवा पसरायला लागल्या. त्यात ही एक अफवाही पसरली की आता सरकार लॉकरचीही चौकशी करणार आहेत.