नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजर केंद्र सरकारने ८.७ टक्क्यांवरून कमी करून ८.१ टक्के केला आहे. तर किसान विकास पत्रावरील व्याजदरही ८.७ टक्क्यांवरून कमी करून ७.८ टक्के करण्यात आले आहे. यामुळे कर्मचारी वर्ग तसेच सामान्य लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


याशिवाय पोस्टतल्या रिकरिंगवरचं व्याजही कमी करण्यात आलंय. सुकन्या योजना, किसान विकास पत्र अशा सर्वच योडजनांवरचे कर कमी करण्यात आले आहेत...या मोठा फटका आता सर्वसामन्य जनतेला बसणार आहे. चार राज्यातल्या  निवडणूकांच्या तोंडावर आलेला हा निर्णय सरकारला चांगलाच अंगाशी येण्याची शक्यता आहे.