कानपूर: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखाचा क्षण. पण लग्नाचे विधी सुरु असतानाच नवरदेवाची गर्लफ्रेंड तिकडे आली तर काय होईल ? एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही कथा खरंच घडलीये कानपूरमध्ये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नमंडपामध्ये फेरे सुरु असतानाच नवरदेवाची गर्लफ्रेंड तिथे आली, आणि तिनं नवरदेवाला आवाज द्यायला सुरुवात केली . तिला बघून नवरदेव चक्क भोवळ येऊन तिथेच पडला. 


लखनऊमधल्या मुलाचं लग्न उन्नावमधल्या शुक्लागंजमध्ये होतं. सुरवातीला हा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही, पण जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा मुलीकडचे मात्र चांगलेच संतापले, आणि प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं.


या मुलासोबत आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, आमचा साखरपुडाही झाला आहे, असा दावा मुलीनं केला, पण त्या मुलीला मात्र कोणतेही पुरावे देता आले नाहीत. त्यामुळे मुलगी तिथून निघून गेली. 


पण हा सगळा गोंधळ झाल्यानंतर लग्न होणार का नाही हाच मोठा प्रश्न होता, अखेर मुलीच्या आई-वडिलांनी तिला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला.