नवी दिल्ली : नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयान याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळतेय. यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या निर्णयाचा राज्यातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात नीटच्या परीक्षेसाठी मर्यादित केंद्रांची घोषणा करण्यात आली होती. यामुळे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना खटाटोप करावा लागला होता. 


मात्र आता परीक्षा केंद्र वाढवल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. राज्यातून यंदा जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देतायत. या विद्यार्थ्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक नागपूर आणि औरंगाबाद ही सहा केंद्रं मंजूर करण्यात आली होती.