`एक देश एक टॅक्स`... काय स्वस्त, काय महाग? पाहा...
लोकसभेत झालेल्या मोठ्या चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स) विधेयक संमत झालं. हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल, याचा हा आढावा...
नवी दिल्ली : लोकसभेत झालेल्या मोठ्या चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स) विधेयक संमत झालं. हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल, याचा हा आढावा...
GST - वस्तू आणि सेवा कर
- जीएसटी विधेयक 2017 मध्ये पाच संशोधनांसहीत संमत करण्यात आलंय.
- जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर वेगवेगळा टॅक्स भरावा लागणार नाही... संपूर्ण देश हा एक मोठा बाजार बनू शकेल.
- एखाद्या वस्तूची संपूर्ण देशभर किंमत एकच असू शकेल. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केली जाणाऱ्या तस्करीला आळा बसेल.
वेगवेगळी टॅक्सेशन स्लॅब
- जीएसटीमध्ये चार दर लागू असतील... अधिकाधिक सीमा 28 टक्के असेल. तसंच लग्झरी सामानावर वेगळा सेस लावण्यात येईल.
- खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर 0 टक्के टॅक्स आकारला जाईल.
- दुसरा टॅक्स स्लॅब 5 टक्के असेल
- तिसरा स्लॅब 12 ते 18 टक्यांवर असेल
- तर सर्वाधिक टॅक्स स्लॅब 28 टक्के असेल...
- लग्झरी स्लॅबमध्ये तंबाखू, महागड्या गाड्या इत्यादी (यावर सेसही लागणार)
या वस्तू होणार महाग...
फोन बिल
हॉटेलमध्ये खाणं-पिणं
विमान प्रवास
रेल्वे तिकीट
ट्रक - टेम्पो
या वस्तू होणार स्वस्त
दुचाकी वाहन
छोट्या कार
फॅन
वॉटर हीटर
कूलर
सिनेमे पाहणं