अहमदाबाद : २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीत झालेल्या हत्याकांडाप्रकरणी आज विशेष न्यायालय निकाल देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी ५९ आरोपी असून त्यातले १४ जण गेल्या १४ वर्षांपासून तुरुंगात आहेत. तर इतर सर्वांना जामिनावर सोडण्यात आले आहे. गुलबर्गा सोसायटीत काँग्रेसचे माजी खास खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. 


तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणात एहसान जाफरींच्या पत्नी जकिया जाफरी न्यायासाठी लढत आहेत. SITनं केलेल्या तपासानंतर विशेष न्यायालयात २०१५ मध्ये सुनावणी पूर्ण केलीय. आज न्यायमूर्ती पी. व्ही. देसाई याप्रकरणी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे.