महिलेच्या पोटातून निघालं लाटणं... प्रकृती गंभीर
एका महिलेच्या पोटातून तब्बल एक फूट लांब लाकडाचं लाटणं डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढलंय.
देहरादून : एका महिलेच्या पोटातून तब्बल एक फूट लांब लाकडाचं लाटणं डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढलंय.
उत्तराखंडच्या नैनीतालमधील हल्दवानी येथील सुशीला तिवारी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ही महिला सध्या जीवन-मरणाच्या दारात उभी आहे. या महिलेची ओळख जाहीर करण्यात मात्र डॉक्टरांनी नकार दिलाय.
मूळची नेपाळी असलेल्या या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास येतंय. प्रकरण गंभीर असल्यानं पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच माहिती देणार असल्याचं म्हटलंय.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तीन-चार दिवसांपूर्वी या 40 वर्षीय महिलेला पोटात दुखत असल्याच्या कारणानं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंडच्या अहवालानुसार पोटात गॅस दिसून येत होता.
ऑपरेशनवेळी मात्र डॉक्टरांनाच धक्का बसला. या महिलेच्या पोटातून चक्क 30 सेंटिमीटरचं लाटणं बाहेर काढण्यात आलं. ही महिला अजूनही बेशुद्धावस्थेत आहे... तिची प्रकृती गंभीर आहे.