भारतात हामिद करझाई चौथ्यांदा पिता
अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई भारतात चौथ्यांदा पिता बनले आहेत. हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिलाय. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथं अपत्य आहे.
नवी दिल्ली : अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई भारतात चौथ्यांदा पिता बनले आहेत. हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिलाय. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथं अपत्य आहे.
'करझाई यांच्या पहिल्या तिन्ही मुलांचा जन्म येथील अपोलो रुग्णालयात झाला आहे. चौथ्या कन्येचा जन्म शनिवारी सकाळी ११ वाजता अपोलो रुग्णालयात झाला. पत्नी आणि कन्येला भेटण्यासाठी काही वेळ ते रुग्णालयात आले होते. यानंतर ते लंडनला रवाना झाले,' अशी माहिती भारतामधील अफगणिस्तानचे राजदूत शाइदा मुहम्मद अब् दाली यांनी दिली आहे.