एचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेनंही हे शुल्क कसं आणि किती आकारण्यात येईल याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे.
एचडीएफसी बँकेची नियमावली
- महिन्याला चार व्यवहार केल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना पुढच्या प्रत्येक व्यवहारासाठी प्रत्येकी १५० रुपये शुल्क द्यावं लागणार आहे.
- ग्राहकांनी ज्या एचडीएफसी बँकेत खातं उघडलं तिथून महिन्याला २ लाख रुपये काढता येतील. २ लाखांच्या वर ग्राहकाला प्रत्येक एक हजार रुपयासाठी ५ रुपये द्यावे लागतील.
- ग्राहक एचडीएफसीच्या दुसऱ्या शाखेतून दिवसाला २५ हजार रुपये काढू शकतात. यापुढे प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागणार आहेत.
- सिनियर सिटीझन्स आणि लहान मुलांच्या खात्यांमधून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.