मुंबई : जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत. 500 आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून अनेक ठिकाणी नागरिकांकडून तितक्याच धैर्यानं नोटा बदलण्यासाठी चांगली साथ मिळताना दिसत आहे. तुरकळ प्रकार वगळता साऱ्या देशात ही प्रक्रिया शांतते सुरू आहे. बँकांमध्ये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहे. काही ठिकाणी रोकड संपल्याचा किंवा ती पोहचलीच नसल्यानं थोडा खोळंबा होतो आहे. पण बँकेचे कर्मचारी, उपस्थित पोलिस यंत्रणा आणि नागरिक सर्वांची या उपक्रमाला साथ मिळताना दिसत आहे.


आठ तारेखला मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे या नोटांमध्ये रोख रक्कम आहे त्यांना ही रक्कम बँका आणि पोस्ट ऑफिसममध्ये बदलून चलनात असणाऱ्या नोटांमध्ये आजपासून बदलून मिळत आहेत.


चलनी नोटांची कमतरता होऊ नये म्हणून 500 आणि 2000च्या नव्या नोटाही आजपासून चलनात येत आहेत.  शिवाय शंभर आणि त्या खालच्या नोटांचीही वाढीव छपाई करण्यात आली आहे. शिवाय नोटा बदलण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या शनिवारी आणि रविवारी बँका उघड्या राहणार आहेत.