१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत.
मुंबई : भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत.
राज्यभरात उष्णतेची लाट कायम आहे. सुर्यनारायण आग ओकतोय. नागपूरसह संपूर्ण विदर्भही तापलाय. नागपूर, वर्धा आणि अकोल्यात ४५ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर विदर्भातील सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय. चंद्रपूरमध्ये पा-यानं ४५.८ डिग्री सेल्सियस तापमान गाठलंय. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीमध्ये ४५.९ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर इकडे पुण्यातही तापमानाचा पारा 40.7 अंशावर पोहचलाय. पुण्यात या मोसमातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे.
राज्यात उष्णतेची लाट येत असल्याने पुढील काही दिवस उष्णता वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे डोळे...या उष्णतेच्या काहिलीत डोळ्यांची आग होते. तसंच डोळ्यातून पाणी येणं, डोळे चरचरणे अश्या समस्येना सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रत्येकानं किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजेत तसेच डोळ्यावर काळा चष्मा लावला पाहीजे. यासंदर्भात नेत्रचिकित्सक तात्याराव लहाने यांनी काळजी घेण्याचा सुचना केल्या आहेत.