पंतप्रधान मोदींच्या `मन की बात`मधले महत्त्वाचे मुद्दे
पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.
नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.
पंतप्रधानांनी म्हटलं की,
१. २ ऑक्टोबरला गांधीजी आणि शास्त्रींची जयंती आहे. माझा आग्रह आहे की, कुटुंबात कोणत्याही खादीच्या वस्तू खरेदी कराव्यात.
२. २ ऑक्टोबरला स्वच्छतेच्या कामात स्वत:ला जोडा आणि त्याचा फोटो, व्हिडियो ‘NarendraModiApp’ वर शेअर करा. विभागामध्ये कुठेही काही चांगलं काम चालत असेल तेथे सहभागी व्हा.
३. सरकारमधील विविध विभागांनी एक असं वेळापत्रक बनवलं आहे. जे १५ दिवस स्वच्छतावर विशेष लक्ष देतात.
४. ऑक्टोबरला पोरबंदर हे हगणदारीमुक्त होणार आहे. ज्यांनी हे काम केलं त्यांना शुभेच्छा.
५. 1969 वर फोन करुन तुम्ही तुमच्या शहरातील शौचालय निर्मितीची माहिती मिळवू शकता आणि सूचनाही देऊ शकता.
६. आज स्वच्छतेसोबत आरोग्य जोडलं जातं तसंच रेवेन्यू मॉडल देखील अनिवार्य आहे.
७. प्रत्येकाने स्वच्छतेसाठी योगदान द्यावं. पत्रकारांनी देखील एक सकारात्मक भूमिका निभावली आहे.
८. नागरिकांच्या सन्मानासाठी उघड्यावर शौचापासून मुक्ती असं एक अभियान सुरु झालं आहे.
९. पॅरालिंम्पिकमध्ये दिव्यांगांनी जनरल ऑलिम्पिकचे रेकॉर्ड तोडले.
१०. 2 वर्षापूर्वी गांधीजीच्या जयंती निमित्त मी स्वच्छता- हा स्वभाव बनला पाहिजे, नागरिकाचं कर्तव्य असलं पाहिजे असं म्हटलं होतं.
११. उरी हल्ल्यानंतर एका मुलाने हर्षवर्द्धनने रोज तीन तास अधिक अभ्यास करण्याचा आणि चांगला नागरिक बनण्याचा संकल्प केला आहे.
१२. पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड पदक जिंकणाऱ्या देवेंद्र झाझरियाने दाखवून दिलं की, शरीर त्यांच्या संकल्पाला कमी नाही करु शकलं.
१३. दीपा मलिकने मेडल प्राप्त करत म्हटलं की, मी अपंगत्वाला पराजित केलं. या वाक्तात खूप मोठी ताकत आहे.
१४. पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीने दिव्यागांप्रती असलेला विचार बदलला.
१५. 1965 च्या युद्धात शास्त्रीजींनी‘जय जवान- जय किसान’ चा मंत्र देऊन सामान्य व्यक्तीला देखील देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
१६. कश्मीरच्या जनतेसोबत बोलू इच्छितो. की ते देश विरोधी शक्तींना समजत आहेत. ते शांतीच्या मार्गावर चालत आहेत.
१७. नेत्यांना बोलण्याची सवय असते. पण सैनिकांना बोलण्याची नाही तर करण्याची सवय असते.
१८. उरी हल्ल्यातील शहीदांना नमन करतो. त्यांना श्रद्धांजली देतो.