१००० आणि ५०० च्या नोटांचा इतिहास
सर्वात प्रथम १९५४मध्ये १०००च्या नोटा चलनात आल्या होत्या. त्यानंतर सर्वात प्रथम १९७८ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आला. त्यानंतर २००० मध्ये दुसऱ्यांदा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
मुंबई : सर्वात प्रथम १९५४मध्ये १०००च्या नोटा चलनात आल्या होत्या. त्यानंतर सर्वात प्रथम १९७८ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आला. त्यानंतर २००० मध्ये दुसऱ्यांदा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
एक हजार रुपयांची नोट
१९५४मध्ये १००० रुपयांची नोट पहिल्यांदा चलनात आली होती.
१९७८च्या जानेवारीमध्ये १००० रुपयांची नोट बंद करण्यात आली.
२००० मध्ये दुसऱ्यांदा १००० रुपयांची नोट चलनात आली होती.
५०० रुपयांची नोट
१९८७मध्ये पहिल्यांदा ५०० रुपयांची नोट चलनात आली होती.
२००५ मध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटेत बदल करण्यात आले होते.
(मशीनद्वारा चेक करण्यात येणारा सुरक्षा धागा, इलेक्ट्रोटाइप वॉटर मार्क, नोटेवर छापाईचे वर्ष छापण्यात आले.)
काही रोचक गोष्टी
१९३८मध्ये पहिल्यांदा रिझर्व बँकेने १०००० रूपयांची नोट भारतात छापण्यात आली होती.
१९३८मध्ये रिझर्व बँकेने पेपर करंस छापण्यात आली होती. ही पाच रुपयांची नोट होती. त्यानंतर १० रुपये आणि १०० रुपयांची नोट छापण्यात आली होती.
१९५४मध्ये पहिल्यांदा १००० आणि १०००० रूपयांचे नोट छापण्यात आले होते. त्यानंतर ५००० रुपयांची नोट छापण्यात आली होती.
१९५४मध्ये १०००० आणि ५००० रुपयांची नोट छापण्यात आली होती.
१९७८मध्ये १०००० आणि ५००० रुपयांची नोट पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
नेपाळमध्ये ५०० आणि १००० रुपयांवर बॅन
नकली नोटांची वाढत्या संख्येमुळे नेपाळमध्ये भारतीय ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. अशा नोटांसह कोणी सापडले तर नेपाळमध्ये दंड करण्यात येत होता. यासंदर्भात भारत आणि नेपाळच्या सोनाली बॉर्डरवर एक नोटीस लावण्यात आली होती.