मुंबई : हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिलात लावण्यात येणारा सर्व्हिस चार्ज तुम्हाला भरावा लागणार नाही. अर्थात त्यामुळे तुमच्या हातात पडणारं बिलही कमी असेल.


खरं म्हणजे, बिलमध्ये लावण्यात येणारा सर्व्हिस चार्ज अगोदर वैकल्पिक होता. परंतु, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट मालकांनी मात्र त्याला बिलात जोडून ग्राहकांना ते भरण्यासाठी बाध्य केलं. याबाबत मंत्रालयाकडे अनेक तक्रारी गेल्या होत्या.


सरकारनं केली घोषणा


सरकारनं सर्व हॉटेल आणि रेस्टॉरन्टच्या मालकांना ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज वसूल करण्याची अॅडव्हायजरी जाहीर केलीय. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याची घोषणा केली. यापूर्वी सरकारनं हॉटेल, कंपनी आणि रेस्टॉरन्ट चालवणारे सर्व्हिस चार्ज देण्यासाठी ग्राहकांना बंधनकारक करू शकत नाहीत, असं म्हटलं होतं. 


मंत्रालयानं सर्व राज्याताली सरकारांना याबाबत कंपन्या, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टना याबाबतीत सूचना देण्यास बजावलंय.