नवी दिल्ली : देशात दररोज वाया जाणाऱ्या अन्नाविषयी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्यावर अन्न बचतीसाठी सरकार पावलं उचलताना दिसत आहे. तुमच्या थाळीत काय असणार हे सरकार ठरविणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याविषयी मोठ्या हॉटेलमध्ये अन्नाचं प्रमाण ठरवण्यासाठी नियम तयार करण्यात येतील असं म्हटलंय. नव्या नियमानुसार मोठ्या हॉटेल्समध्ये प्रत्येक पदार्थात नेमका किती जिन्नस ग्राहकांना मिळेल हे मेन्यू कार्डावर लिहावं लागणार आहे.


म्हणजे जर एक प्लेट बटर चिकनची ऑर्डर दिली, तर एका प्लेटमध्ये चिकनचे किती पीस मिळणार, किती ग्रॅम ग्रेव्ही मिळेल हे ग्राहकाला आधीच समजलेलं असेल. त्यानुसार ग्राहक किती अन्न ऑर्डर करायचं हे ठरवू शकतील. आणि अन्न वायाचा जाण्याचं प्रमाण कमी होण्याचं कमी करता येईल असं पासवान यांचं म्हणणं आहे.