मुंबई : शेअर ब्रोकिंगमधून आपला व्यवसाय सुरु करणारे आणि मुंबईतल्या विविध भागात आपली रिटेल स्टोअर असणारे  राधाकिशन दमाणी एका रात्रीत दलाल स्ट्रीटवरील चर्चेचा विषय ठरलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दमाणी यांनी आपल्या शेअर्सची किंमत २९९ रुपये ठेवली होती. मात्र बाजारातल्या अंकांनी झालेल्या ११४% तेजीनंतर ती किंमत ६४१ रुपये झाली. डी-मार्टमधील वस्तुंच्या किंमती फ्युचर रिटेल, ट्रेंट, व्ही-मार्ट रिटेल आणि शॉपर्स टॉपच्या एकूण किंमतींपेक्षा जास्त आहेत.


उल्लेखनीय म्हणजे, दमाणी यांना २००० सालच्या सुरुवातीला टेक बूममध्ये सहभाग नाकारला गेला होता... तीच व्यक्ती आता इतक्या करोड रुपयांच्या उलाढालीचा व्यवसाय सांभाळते. 


या ६१ वर्षीय राधाकिशन दमाणींची या कंपनीत ८२ टक्क्यांची भागिदारी होती. ही संपत्ती आता जवळपास ३३,१२५ करोड रुपयांची आहे. इतकंच नव्हे तर व्हीएसटी इंडस्ट्रीज, ब्लू डार्ट, सुंदरम फास्टनर्स, टीव्ही १८, ३ एम इंडियासारख्या कंपनीत त्यांची जवळपास २,६५० करोडांची भागेदारी आहे. 


राधाकिशन दमानी

 


एकूण उत्पन्न आणि भागेदारी पाहता दमाणी एकूण ३५,७७५ करोडांचे मालक आहेत. त्यांच्या एकूण उत्पन्नानुसार ते जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी पहिल्या पंधरामध्ये आहेत.


या कंपन्याचा मूळ बाजार भांडवलच २४,००० करोड रुपयांचं आहे. देशभरात बऱ्याच ठिकाणी डी-मार्टची सुपर मार्केट्स आहेत.