नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यानंतर रात्री लगेच खाते वाटपही केले. यावेळी स्मृति इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना प्रकाश जावडेकर यांना बढती देण्यात आली. त्यांना स्मृति इराणींचे मनुष्यबळ विकासमंत्री खाते देण्यात आले. तर स्मृति इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.


नरेंद्र सिंग तोमर यांना ग्रामविकास मंत्री तर रविशंकर प्रसाद हे नवे कायदामंत्री असतील. तर व्यंकय्या नायडू नवे माहिती आणि प्रसारणमंत्री, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांना नगरविकास खाते तर राज्यमंत्री (स्वतंत्र) डॉ. सुभाष भामरे यांना संरक्षण खाते देण्यात आले असून रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात देण्यात आलेय. एम. जे. अकबर यांना परराष्ट्र खाते देण्यात आलेय.