Posted by Ugoldi Usmaan on Tuesday, 8 March 2016

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : हॉटेलच्या दारातून खाणाऱ्यांच्या ताटाकडे आशेने पाहणारे आणि दारिद्र्याचे चटके सोसणारे चिमुकले बहीण भाऊ. त्या दोघांना जेऊ घातल्यानंतर बिल देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मानवतेचे बिल हातात पडले. हे बिल सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत होते. आता याच मानवतेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.


केरळ  येथील मल्लापूरम येथे हॉटेलमध्ये जेवणारा एक माणूस दोघा गरीब चिमुकल्या भावंडाना आत बोलावतो. काय खायचे असे विचारल्यावर त्याच्या ताटाकडेच चिमुकले बोट दाखवितात. त्याप्रमाणे ऑर्डरही दिली जाते. चिमुकल्यांचे पोट भरल्यावर तो माणूस बिलाची मागणी करतो आणि बिल पाहून थक्क होतो. बिलावर लिहिलेलं असतं, 'आमच्याकडे मानवतेची किंमत मोजता येईल असं मशिन किंवा आकडा नाही. तुमचं भलं होईल..!' ही मानवतेचे 'बिल' सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 


त्यानंतर त्याचा एका इंग्रजी वृत्तपत्राने शोध घेतल्याचा दावा केला. अखिलेश कुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून ते दुबईमध्ये अभियंता म्हणून नोकरी करत असल्याचे म्हटलेय. आता असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.