पक्ष सोडलेला नाही, मी भाजपमध्येच : नवज्योत कौर सिद्धू
नवज्योत सिंग सिद्धूनं भाजपचा राजीनामा दिला आहे, असे सिद्धूची पत्नीने स्पष्ट केले आहे. पण मी मात्र अजून भाजप सोडलं नाही, असंही तिनं त्यावेळी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धूनं भाजपचा राजीनामा दिला आहे, असे सिद्धूची पत्नीने स्पष्ट केले आहे. पण मी मात्र अजून भाजप सोडलं नाही, असंही तिनं त्यावेळी स्पष्ट केले.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. सिद्धू यांना पंजाबसाठी काम करायचंय, असे त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे.
सिद्धू आपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पंजाबमध्ये आपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही सिद्धूचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे.