मीच सपाचा अध्यक्ष, मुलायम सिंग यांनी अखिलेशला ठणकावलं
समाजवादी पार्टीतील यादवी संपता संपत नाहीए. समाजवादी पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष तर अखिलेश सिंह यादव फक्त मुख्यमंत्री असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : समाजवादी पार्टीतील यादवी संपता संपत नाहीए. समाजवादी पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष तर अखिलेश सिंह यादव फक्त मुख्यमंत्री असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
रामगोपाल यादव यांना पक्षातून निष्काषीत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना कोणतेच अधिकार नसून त्यांनी बोलवलेलं अधिवेशन भंपक असल्याचा दावा मुलायम सिंह यादव यांनी केलाय. दरम्यान राजीनामा देण्यास तयार असल्याचं अमर सिंह यांनी सांगितलं आहे.