`आमीरबद्दल जे बोललो ते योग्य`
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खानला लक्ष्य केलं होतं.
पणजी : असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खानला लक्ष्य केलं होतं. पर्रिकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. या टीकेनंतरही पर्रिकर त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी जे बोललो त्यानंतर अनेकांनी ते योग्य असल्याचं म्हटल्याची प्रतिक्रिया पर्रिकर यांनी दिली आहे.
काही जण भाजपविरोधात द्वेष पसरवत आहेत आणि असामाजिक तत्वांबद्दल सहानुभूती व्यक्त करत असल्याचा आरोपही पर्रिकर यांनी केला आहे. पर्रिकर भाजपच्या अनुसुचित जमाती संमेलनामध्ये बोलत होते.
पुण्यामध्ये मी जे बोललो त्याबद्दल पुन्हा बोलणार नाही. ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी ते यूट्यूबवर जाऊन ऐकावं असा टोलाही पर्रिकर यांनी लगावला आहे. एक अभिनेता म्हणाला की त्याच्या पत्नीला भारताबाहेर राहायला जायचं आहे. हे एक अहंकारी वक्तव्य आहे. मी गरीब आहे आणि माझं घर छोटं आहे पण मला माझ्या घरावर प्रेम आहे. मी नेहमी माझ्या घराचा बंगला करण्याची स्वप्न बघीन. जे लोक देशविरोधी बोलतात त्यांना धडा शिकवला पाहिजे, असंही पर्रिकर म्हणाले आहेत.