हवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड
5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.
बंगळुरू : 5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.
बाथरूमच्या टाईल्सच्या मागे तिजोरीत हे सगळं घबाड लपवण्यात आलं होतं. कर्नाटक आणि गोव्याच्या आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. हवाला डिलरकडे एवढी रक्कम कुठून आली याचा शोध सुरू आहे.