नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता खुद्द पंतप्रधानांनी देशाच्या जनतेकडून नोटाबंदीवर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. त्यांनी NM Appच्या सहाय्याने जनतेने आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात असे आवाहन केलेय.


भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांनी नोटांवर घातलेली बंदी ही काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात असल्याचे म्हटलेय. 8 नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. 


अनेकांनी मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केलेय. पंतप्रधानांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचारविरोधातील उचललेले पाऊल हे स्वागतार्ह असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.