नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही फी वाढ लागू होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटी तज्ज्ञांच्या एका समितीने ही सूचना मंत्रालयाला दिली होती. गुरुवारी या सूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 


पण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना पूर्णपणे फी माफी दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना आणि आर्थिकृष्ट्या मागास घटकांनाही फी माफी दिली जाणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनाही फी भरण्यात ६६ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. 


गेल्या महिन्यात आयआयटी काऊन्सिलच्या स्थायी समितीने तिप्पट फी वाढीला मान्यता दिली होती. या समितीत आयआयटीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.