यंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार
यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.
नवी दिल्ली : यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन हा अंदाज जाहीर केला जाईल. दरवर्षी हवामान खातं तीन टप्प्यात मान्सूनचा अंदाज वर्तवतं. त्यापैकी पहिला अंदाज आज वर्तवण्यात येईल. गेल्यावर्षी हवामान खात्यानं वर्तवलेला मान्सूनचा अंदाज खरा ठरला होता.
यंदाही हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी कंपन्यांनी यंदाही मान्सूनवर अल निनोचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवलीय. त्या पार्श्वभूमीवर आज हवामान खातं पहिला अंदाज वर्तवणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीनं हवामानाच्या या अंदाज महत्वाचा मानला जातो.