नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमधील पाच महत्त्वाची गोष्टी तुम्हांला माहिती पाहिजे. 


 
१) नोकरदारांसाठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे. 
 
तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत राहणार आहे. तसेच बचतीवर ५० हजारांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. 
 
> दोन लाख ५० हजार इन्कम टॅक्स नाही


> दोन लाख ५० हजार ते पाच लाखपर्यंत १० टक्के इन्कम टॅक्स, ३ हजार रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स कमी करणार... 


> पाच ते १० लाखपर्यंत २० टक्के इन्कम टॅक्स 


> दहा लाखांच्या पुढे ३० टक्के इन्कम टॅक्स 


> महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली 


> वरिष्ठ नागरिकांना तीन लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही



> २.५ लाखांच्या बचतीवर इन्कम टॅक्स सूट देण्यात आली आहे.  


 
 २) सर्वसामान्यांना दिलासा 


 1) छोट्या करदात्यांना जेटलींचा दिलासा, कररचनेमध्ये कोणताही बदल नाही


2) करसवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरच


3) 5 लाखांच्या उत्पन्नामध्ये 3 हजारांची सूट


4) 2 करोड लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 3 हजारांची सूट मिळणार


5) हाऊस रेन्ट अलावन्स 24 हजारांवरून 60 हजारांवर


6) पहिल्या गृहकर्जासाठी व्याजदरात सवलत


7) पहिल्यांदा घर खरेदी केल्यावर 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांवर ५० हजारांपर्यंतची सूट


8) 50 वर्गमीटरवर हाऊसिंग स्कीमवर सर्व्हिस टॅक्स लागणार नाही


9) सबसिडी आणि सुविधा आधारनुसारच


10) 1 कोटी पर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांचा सरचार्ज 3 टक्क्यांनी वाढला 


 
 ३) आधारकार्ड


 नागरिकांचे ओळखपत्र असलेल्या आधारकार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार असल्याचे जेटलींनी यावेळी घोषित केले. यामुळे सरकारद्वारे दिली जाणारी सबसिडीचा फायदा थेट नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास फायदा होईल. 
 
सध्या आधारकार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठीचे ओळखपत्र आहे. आतापर्यंत ९८ कोटी लोकांना आधार नंबर जारी करण्यात आलेत. ११.१९ कोटी प्रत्यक्ष लाभ अंतरण खात्यांशी आधारकार्ड जोडले गेले आहे. त्यामुळे एकूण लाभार्थींची संख्या १६.५ कोटींवर पोहोचलीये. 



 


 ४) काय झाले स्वस्त, काय महाग


 काय झाले स्वस्त :
- पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा
- घराची किंमत ५० लाख रूपयांपर्यंत असायला हवी.
- पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ३ हजार रुपयांची सूट
- घरभाडे टॅक्सवर सूट
- ५ लाख कमाईवर एचआरएवरील सवलत २४ हजारांवरून ६० हजारांपर्यंत वाढविण्यात आली.
- ३५ लाखांपर्यंतचया होम लोनर ५० हजारांची टॅक्स सूट 


महाग काय झाले :
- सोन्या चांदीचे दागिने महागणार
- हिऱ्याचे दागिने महागणार
- लक्झरी कार, ब्रँडेड कपडे महागणार, 
- बिडी सोडून इतर तंबाखूजन्य पदार्थ
- सिगरेटही होणार महाग
- दगडी कोळसा
- लेदर बूट, चपलाही महागणार
- दहा लाखापेक्षा अधिक किंमतीच्या गाडया महागल्या.
- सोन्यावरील आयात शुल्क वाढवणार
- डिझेल गाडयांवर अडीच टक्के आणि पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस.


 
५) शेतकऱ्यांसाठी


1) 2022 पर्यंत शेतकऱ्यांचा उत्त्पन्न दुपट्टीनं वाढणार


2) कृषीकर्जासाठी ९ लाख कोटी


3) पंतप्रधान पीक योजनेसाठी ५५०० कोटी रुपयांची तरतूद


4) शेतकऱ्यांसाठी विम्याचा हप्ता कमीत कमी असणार


5) कृषीसाठी ३५ हजार ९८४ कोटींची तरतूद


6)  डाळींच्या उत्पादनासाठी ५०० कोटींची तरतूद


7)  5 लाख हेक्टर शेतीवर जैविक प्रयोग राबवणार


8) सिंचनासाठी नाबार्डला २० हजार कोटी


9) २८.५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार


10) मे २०१८ पर्यंत सगळ्या खेड्यांमध्ये वीज पोहोचणार


11) ग्रामीण विद्युतीकरणासाठी ८५०० कोटींची तरतूद


12) बियाणांच्या तपासणीसाठी दोन हजार प्रयोगशाळा


13) शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन, पशुसंजीवनी योजना


14) सॉईल हेल्थ कार्ड देशभरात पोहोचवणार


15) मनरेगा अंतर्गत बांधणार 5 लाख तलाव


16) दुष्काळी भागातल्या शेतीवर विशेष लक्ष


17) दुष्काळी भागासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना


18)पीक वीम्यासाठी 5500 कोटींची तरतूद


19) शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देणार



20) शेतकऱ्यांसाठी स्वास्थ्य वीमा योजना