बाहुबली सिनेमाच्या निमार्त्याच्या घरी आयकर विभागाची धाड
काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम आता देशभरात दिसू लागला आहे. काळा पैसा घरात जमा करुन ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर आयकर विभाग ही सतर्क झाला आहे. आयकर विभागाची प्रत्येकावर बारीक नजर आहे. काल अनेक ठिकाणी देशभरात आयकर विभागाने छापे देखील टाकले आहेत.
हैदराबाद : काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम आता देशभरात दिसू लागला आहे. काळा पैसा घरात जमा करुन ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर आयकर विभाग ही सतर्क झाला आहे. आयकर विभागाची प्रत्येकावर बारीक नजर आहे. काल अनेक ठिकाणी देशभरात आयकर विभागाने छापे देखील टाकले आहेत.
आज देखील आयकर विभागाने कारवाई सुरुच ठेवल्याचं दिसतंय. बाहुबली सिनेमाच्या निर्मात्याच्या कार्यालयात आयकर विभागाने झाडाझडीत सुरु केली आहे. अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बाहुबली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. बाहुबली सिनेमाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. यासाठी मोठं बजेट सिननिर्मात्यांनी लावलं आहे. ३५० ते ४०० कोटी रुपये रिलीज होण्याआधीच सिनेमाला मिळाले आहेत. त्यामुळे आयकर विभागाचं याकडे नजर गेल्याचं म्हटलं जातंय. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आयकर विभागाने दिलेली नाही.