नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.


मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील नोटबंदीनंतर ४०० खाती असे मिळाले आहेत ज्यामध्ये काळा पैसा जमा केला गेला आहे. या खात्यांमध्ये १ कोटीहून अधिक पैसे जमा केले गेले आहेत. चौकशीनंतर आयकर विभागाने या व्यक्तींना नोटीस पाठिवली आहे.