नवी दिल्ली : भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांसह ईशान्य आणि नैऋत्याला असणाऱ्या १३ देशांमध्ये आज सकाळपासून खग्रास सूर्यग्रहण बघायाला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे ईशान्येकडच्या सर्व राज्यांसह, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात सूर्योदयाच्या वेळी खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळतंय. सुमारे सव्वा तास चालणारा निसर्गाचा हा उन सावल्यांचा खेळ अनेक खगोल प्रेमींची पर्वणी ठरतोय.


 


इंडोनेशियातल्या १५५ किलोमीटरच्या पट्ट्यात तीन मिनिटं सूर्य पूर्णपणे झाकोळला जाणार आहे.  सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आल्यामुळे हा सावल्यांचा खेळ निर्माण होतो. निसर्गाचा हा चमत्कार फक्त आमावस्येच्या दिवशीची होऊ शकतो. यंदा आज होणारं सूर्यग्रहण पहिल्यांदाच बघायला मिळाले.