नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे.  गेल्या वीस वर्षात भारतानं फायटर विमान खरेदीचा केलेला हा पहिला करार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत.  पुढच्या 66 महिन्यात ही विमानं भारताला सूपर्द करण्यात येतील. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यिव्हज ली ड्रायन यांच्यामध्ये या जेटससाठी साडे सात अब्ज युरोंच्या या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.


युपीए सरकारनं हाच करार फ्रान्सबरोबर केला होता. पण नरेंद्र मोदींनी हा करार रद्द करत हा नवा करार केला. या नव्या करारामध्ये पंच्याहत्तर कोटीं युरोंची बचत होणार आहे.


राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाला भारताच्या हद्दीत राहुनच शत्रूवर हल्ला करण्यात येणार आहे. या विमानामध्ये मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील.