मुंबई : मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.
 
२०१९ मध्ये काय असेल चित्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडिया ९ टक्क्यापेक्षा कमी व्याजदरात होम लोन देणार आहे. त्यामुळे पुढील २ वर्षात रियल एस्टेट सेक्टरमध्ये तेजी येणार आहे. लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र0 सरकार गरीबांसाठी प्रभावी होम लोन ४ टक्क्यांवर देण्याचा प्रयत्न करते आहे. २०१९ पर्यंत सामान्य व्यक्तीसाठी व्याजदर ७ ते ८ टक्के असेल.


देशाचा जीडीपी वाढणार


मार्च 2014 मध्ये देशाचा जीडीपी ग्रोथ 6.60 टक्के होता. मार्च 2017 मध्ये तो 7.10 टक्के झाला आहे. आर्थिक वर्ष 2018 साठी विश्व बँक आणि आईएमएफचा दावा आहे की, जीडीपी ग्रोथ रेट 7.6 पेक्षा अधिक असणार आहे. २०१९ निवडणुकांआधी जीडीपी रेट 1-2 टक्के वाढणार आहे. भारत जगात सर्वात जलद गतीने धावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा देश बनू शकणार आहे. त्यामुळे ८ ते १० टक्के जीडीपी रेट २०१९ मध्ये दिसण्याची चिन्ह आहेत.


नोटबंदी आणि जीएसटीमुळे 'अच्छे दिन'


रिजर्व्ह बँकेने दावा केला आहे की, भारतात आर्थिक सुधार झाल्यामुळे जीडीपी ग्रोथ रेट 1-2 टक्के वाढू शकतो. अर्थमंत्री आणि आर्थिक गोष्टींचे तज्ज्ञ देखील दावा करत आहेत की, नोटबंदीचा नंतर मोठा फायदा होणार आहे. भ्रष्टाचार आणि काळापैसा बाहेर आल्याने जीडीपी रेट वाढणार आहे.


शेअर बाजारात तेजी


भारतीय शेअर बाजार तेजीत आहे. मार्च 2014 च्या 22 हजारवरुन तीन वर्षात सेंसेक्स 8 हजारवर पोहोचला आहे. देशात जीएसटी लागू झाल्याने चांगले दिवस येणार आहेत. व्यवस्थित मानसून राहिलं तर 1-2 वर्षात अँग्रीकल्चर सेक्टर देखील मजबूत होईल. येणाऱ्या दिवसांमध्ये बाहेरुन गुंतवणूक वाढली तर भारतीय शेअर बाजार मार्च 2019 पर्यंत मोठ्या स्तरावर असेल.