नवी दिल्ली : नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणाम चांगला असेल. तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केल्यास या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पारदर्शी होईल, तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला.


आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेला देश आहे, असे ते म्हणाले. सततच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही आवश्यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.