नाशिक : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे सबंध ताणले गेलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकीस्तानमध्ये होणारी टोमॅटोची निर्यात मंदावली. त्याचा फटका व्यापारी आणि शेतक-यांना बसू लागलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. या घटनेमुळे दोन्ही देशातले संबंध ताणले गेलेत आणि त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील टोमॉटो उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांना बसू लागलाय. पिंपळगाव आणि लासलगावमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची निर्यात होते. साधारणता नाशिकमधून सव्वाशे गाड्या पाकिस्तानमध्ये जायच्या. मात्र, बॉर्डर कधी बंद होईल आणि गेलेल्या गाड्या परत येतील की, नाही याची धाकधूक व्यापा-यांच्या मनात आहे.


पाकिस्तानबरोबरच दुबई आणि बंगलादेशमध्येही नाशिकच्या टोमॅटोची निर्यात होते. एकीकडे आवक वाढलीय आणि दुसरीकडे मागणी घटल्यानं शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे. सरकार आणि आणि बाजार समिती प्रशासनाकडून पर्यायी मार्गाची चाचपणी केली जात असल्याचा दावा अधिकारी वर्गाकडून केला जातोय.


एकूणच कांद्यापाठोपाठ आता नाशिकचा टोमटो उत्पादक शेतकरीही अडचणींत आलाय. त्यातच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बहरात पाकिस्तानच्या सिमा २०१८ पर्यंत बंदिस्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाही परिणाम व्यापारावर होणार आहे. मात्र, त्याही परिस्थिती काही दिवस तोटा सहन करू, मात्र देशाची सुरक्षितता आणि अस्मितेला धक्क लागू देवू नका असं आवाहन नाशिकचा व्यापारी आणि बळीराजा सरकारला करतोय.