नवी दिल्ली : भारत आणि युएई दरम्यान संरक्षण, सुरक्षा, माहिती व तंत्रज्ञान सेवा आणि महामार्गाच्या प्रकल्पासंदर्भातचे १३ करारावर स्वाक्ष-या झाल्या.


युएई पुढील काही कालावधीत भारतात ५ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यासाठी तयार झाला आहे. अबू धाबीचे प्रिंस शेख मोहम्मद बिन जाएद अल नाह्यां आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैद्राबाद हाऊस येथे चर्चा झाली. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी बराक ओबामांना पंतप्रधान मोदींनी चाय पे चर्चा केली होती.